फुल चिंचोली तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री दीपक भैरू प्रक्षाळे यांची निवड.

फुल चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

फुल चिंचोली तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री दीपक भैरू प्रक्षाळे यांची निवड.

फुल चिंचोली तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री दीपक भैरू प्रक्षाळे यांची निवड

पंढरपूर दी.30 ऑगस्ट पंढरपूर तालुक्यातील फुल चिंचोली येथील महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते श्री दीपक प्रक्षाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या तंटामुक्त अध्यक्षपदी निवड दरम्यान सरपंच मा. नारायण जाधव उपसरपंच मा. दादा प्रक्षाळे तसेच भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी वाईस चेअरमन श्री कल्याणराव पाटील तसेच संचालक श्री बिभीषण आप्पा वाघ श्री नागनाथ मोहिते श्री कुबेर गायकवाड (पापरकर) हे उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री धनाजी वाघ श्री चंद्रकांत काळे श्री मारुती वाघ श्री उमाकांत पाटील श्री पांडुरंग गायकवाड श्री चंद्रशेखर जाधव तसेच ग्रामसेवक व्ही आर सुरवसे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तंटामुक्ती नूतन अध्यक्ष दीपक प्रक्षाळे म्हणाले की माझ्यावर सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी फुल चिंचोली गावातील सर्व ग्रामस्थांनी तंटामुक्ती अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडेन असे वक्तव्य दीपक प्रक्षाळे यांनी केले आहे.