कोळा करगणी रस्त्यावर विचित्र दुहेरी अपघातामध्ये तिघेजण जागीच ठार
कोळा करगणी रस्त्यावर जेसीबी व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने एक जण जागीच ठार

कोळा ते करगणी रस्त्यावर बानुगड पाटीजवळ जेसीबी आणि मोटरसायकल यांच्यात समोरा- समोर झालेल्या अपघातामध्ये गोविंद राम आलदर वय ४३ वर्षे कराडवाडी याचा जागीच मृत्यू झाला तर हा अपघात पाहून मोटरसायकलवर पुढे जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडक झाल्याने तानाजी आप्पासो सूर्यवंशी वय ४९ वर्षे रा . कोळा व पुढच्या मोटरसायकल वरील अक्षय राजेश उगलेकर रा ठाणे याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
रुपेश अलदर हा जखमी झाला आहे .याबाबत अधिक माहिती अशी,कोळा करगणी रस्त्यावर बाणुरगड पाटीजवळ बुधवार १० मे रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास बिगर नंबरचा जेसीबी व मोटरसायकल नंबर एम.एच.०४ बी.ए .६५१३ यांच्यात अपघात झाला.या अपघातामध्ये कराडवाडी (कोळा) येथील गोविंद रामा आलदर हा जागेवरच ठार झाला. तर रुपेश आलदर हा जखमी झाला यांची मोटरसायकल ही जेसीबी बकेटच्या खाली अडकली होती.
अपघातस्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सदरचा अपघात पाहून कोळा येथील तानाजी सूर्यवंशी हे पुढे जात असताना वीस मिटर अतरावर पात्रेवाडीहून कोळ्याकडे निघालेल्या भरधाव मोटरसायकला धडक झाली यामध्ये डिलक्स मोटर सायकल नं. एम.एच.१२ डी.एच.५९२७ व मोटरसायकल नं एम.एच.३० बी.एच.२९०९ या दोन मोटरसायकलची समोरा समोर धडक होऊन अपघात झाला त्यामध्ये पात्रेवाडी येथील लग्न कार्यासाठी ठाणे हून आलेला अक्षय उगलेकर जाग्यावरच ठार झाला तर या अपघातामध्ये जखमी झालेला तानाजी सूर्यवंशी पुढील उपचारासाठी सांगली येथे घेवून जाताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
या अपघातामध्ये दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला. यातील एका अपघाताची नोंद सांगोला पोलीस ठाणे येथे झाली असून सांगोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.