पंढरपूर तालुक्यात व शहरात गळफास घेऊन दोन आत्महत्या तर एक जणांचा पाण्यात बुडून मृत्यू.
सेवानिवृत्त मेजर नागटिळक यांनी गळफास घेऊन आत्महत्या

पंढरपूर तालुक्यात व शहरात गळफास घेऊन दोन आत्महत्या तर एक जणांचा पाण्यात बुडून मृत्यू.
पंढरपूर शनिवार दिनांक 25 मार्च पंढरपूर शहरातील अनिल नगर परिसरातील इयत्ता नववी मध्ये शिकणारी विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्याचे अध्यक्ष कारण स्पष्ट झाले नसून सदरची घटना समजतात पंढरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुढील कारवाई सुरू आहे.
त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील सेवानिवृत्त मेजर नागटिळक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सेवानिवृत्त मेजर नागटिळक यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये काही काळ सेक्युरिटी म्हणून सेवा बजावली होती.
गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही याही घटनेचा पोलीस कारवाई सुरू आहे.
सध्या उन्हाळी आवर्तन असल्यामुळे उजनी धरणातून सोलापूर साठी पिण्याचे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीत पाणी आले आहे. नदीकाठी शेती असलेले पाणी उपसा करणारे मोटर काढत असताना शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाला.
शेतकरी विनायक पाटील वय वर्षे 40 राहणार इसबावी यांची शेगाव दुमाला येथे शेती आहे. शेतीला पाणी देण्यासाठी नदीकाठी पाणी उपसा करणारी मोटर बसवण्यात आले आहे या मोटार काढण्याचे काम करीत असताना विनायक एक महिन्यापूर्वी नदीत बुडाला होता. तेव्हा परिसरात नागरिक असल्याने त्यांनी त्यावेळी वाचवले होते. मोठ्या प्रमाणात पाणी आलेले पाण्याची मोटर नदीत बोलू नये म्हणून विनायक हा शनिवारी सकाळी मोटर काढत होता तेव्हा नदीतील खड्ड्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला यावेळी परिसरात कोणी नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.