सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदेमधील अनुकंपाधारकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नियुक्ती आदेश

नगर परिषदेमध्ये सेवेत घेण्याबाबत आदेश अप्पर जिल्हाधिकारी मा तुषार ठोंबरे

सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदेमधील अनुकंपाधारकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नियुक्ती आदेश

सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदेमधील अनुकंपाधारकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नियुक्ती आदेश

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने राज्याचे सरचिटणीस अँड सुनील वाळूजकर व जिल्हाध्यक्ष कॉ सिद्धाप्पा कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील अनुकंपाधारकांची भरती त्वरित करावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते यावेळी जिल्हा अधिकारी मा.मिलिंद शंभरकर साहेब व जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे साहेब यांनी अनुकंपाची भरती लवकरात लवकर करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपरिषदेमधील रिक्त पदावर अनुकंपाधारक युवराज रेवडकरी (सांगोला नगरपरिषद) नितीन सावंत (माळशिरस नगर परिषद) आकाश गजरे (दुधनी नगरपरिषद) शिवराज गोटे (बार्शी नगरपरिषद ) गुरुनाथ हरवाळकर (अक्कलकोट नगर परिषद) या जिल्हाधिकारी कार्याकडील असलेल्या प्रतीक्षा सूची यादीतील उमेदवारांना नगर परिषदेमध्ये सेवेत घेण्याबाबत आदेश अप्पर जिल्हाधिकारी मा तुषार ठोंबरे साहेब यांनी संबंधित नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले होते. त्यानुसार पाच नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी अतिशय सहकार्याची भूमिका घेत या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदेश काढले होते. सदरचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी मा.क्षमा पवार व जिल्हा प्रशासन अधिकारी मा.आशिष लोकरे साहेब यांच्या शुभहस्ते देण्यात आले यावेळी राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड. सुनील वाळूजकर यांनी बोलताना सांगितले की गेल्या दहा वर्षापासून जे कर्मचारी सेवेत असताना मयत झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा खाली नियुक्ती मिळावी म्हणून संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलन केली होती परंतु न्याय मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ही करावे लागले होते परंतु जिल्हा प्रशासन अधिकारी मा आशिष लोकरे साहेब यांच्याकडे याबाबत संघटनेच्या वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता यावर जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे साहेब यांनी विशेष प्रयत्न करून या अनुकंपाधारकांना नियुक्ती देण्याबाबत पुढाकार घेतला होता व त्यांच्यामुळेच आज जिल्हा प्रशासनाने सर्व अनुकंपाधारकांना न्याय मिळवून दिला आहे तसेच ज्या नगर परिषदेमध्ये अनुकंपाधारकांची नियुक्ती झाली आहे तेथील असलेले सर्व मुख्याधिकारी आस्थापना लिपिक यांनीही या कामी सहकार्य केल्यामुळेच सर्व कर्मचारी आज सेवेत आले असल्याचे सांगितले सदर नियुक्ती आदेश देताना राज्याची सरचिटणीस अँड. सुनील वाळूजकर, जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सिद्धाप्पा कलशेट्टी, पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे अक्कलकोट नगर परिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष धनराज कांबळे माळशिरस नगरपरिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष विशाल सावंत व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते