सहकार भारती पंढरपूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर...

सहकार भारती पंढरपूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर...

सहकार भारती पंढरपूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर...

पंढरपूर : सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे संघटक मा. शरदजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व विभाग प्रमुख संतोषजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार भारती पंढरपूर जिल्हा कार्यकारिणी (2025-2027) ची अधिकृत घोषणा करण्यात आली. 

नवीन कार्यकारिणीत सहकारी साखर कारखाना जिल्हा प्रकोष्टपदी उमेश जी परिचारक यांची तर पंढरपूरातील ख्यातनाम प्रज्ञावंत व्यावसायिक CA राजेंद्र विलास बजाज यांची अध्यक्षपदी, शिवानंद बोरामणी यांची महामंत्रीपदी, तर ऍड. प्रशांत बिचुकले यांची संघटन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नविन कार्यकारिणीत अनेक उत्साही व कार्यसमर्थ सहकारी कार्यकर्त्यांचा समावेश असून, सहकार क्षेत्रातील नवचैतन्याची सुरुवात झाली आहे.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सहकार गीताने झाली. दुग्ध प्रकोष्ठ प्रदेशप्रमुख उमेश विरधे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. त्यांनी सहकार भारतीचे संस्थापक श्रध्येय लक्ष्मणराव इनामदार व सहकार तपस्वी सुधाकरपंत परिचारक यांना अभिवादन करून सहकार भारती या संस्थेच्या 1988 पासूनच्या वाटचालीचे अवलोकन उपस्थितांना दिले.

मा. शरदजी जाधव यांनी सहकाराच्या वाढत्या भूमिका, केंद्रीय सहकार मंत्रालय, तसेच 'मेक इन इंडिया', 'स्टार्टअप इंडिया' या उपक्रमांतील सहकार क्षेत्राचे योगदान विषद केले. विविध प्रशिक्षण उपक्रम व उद्योग संधींची माहिती देत सहकार चळवळीचे भविष्य भक्कम असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाला पांडुरंग साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, पंढरपूर बँकेचे चेअरमन सतीशराव मुळे, जिल्हा संघचालक डॉ. रमेश सिद, युवक नेते प्रणव परिचारक, करमाळ्याचे कन्हैयालाल देवी, सुरज रोंगे, सहकार भारतीचे भोवाळकर तसेच पंचक्रोशीतील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह विभाग प्रमुख नाना वाघमोडे, सूत्रसंचालन विशाल तपकीरे तर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याचे नियोजन गणेश हरिदास यांनी केले.कार्यक्रम अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात पार पडला असून नूतन कार्यकारिणीस सहकार क्षेत्रात नवचैतन्याने कार्य करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली आहे..!